
सलमान म्हणतो की, माझ्या चाहत्यांना मला ॲक्शन करताना पाहायला आवडते आणि मला आशा आहे की, ‘टायगर 3’ ही एक परिपूर्ण भेट आहे ज्याची ते वाट पाहत आहेत!”
बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan), आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सद्वारे निर्मित ‘टायगर 3’ च्या (Tiger 3) माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतील 35 वर्षे साजरी करण्यास उत्सुक आहे. सलमान खान सध्या ‘टायगर 3’ मुळे चर्चेत आहे.नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अशातच सलमान खानने ‘टायगर 3’ सिनेमा म्हणजे सिने जगतामध्ये 35 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी प्रेक्षकांना दिलेलं गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. (Salman Khan Celebrating 35 Years In Film Industry)
सलमान खान म्हणतो, “हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे, नॉस्टॅल्जिया, प्रेम, खूप आनंद आणि वेदनांनी भरलेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या प्रवासातील प्रत्येक क्षण मला आवडला आहे. ‘टायगर 3’ च्या रिलीजसह हा वैयक्तिक माइलस्टोन गाठल्याचा मला आनंद होतोय. मला माहित आहे की माझ्या चाहत्यांना मला ॲक्शन करताना पाहायला आवडते आणि मला आशा आहे की, ‘टायगर 3’ ही एक परिपूर्ण भेट आहे ज्याची ते वाट पाहत आहेत!”
‘टायगर 3’ मधील टायगर का मेसेज या व्हिडिओला जगभरातील प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने सलमान खूश आहे. यशराज फिल्म्सने गेल्या आठवड्यात ‘टायगर का मेसेज’ रिलीज केला, हा व्हिडिओ ‘टायगर 3’ च्या ट्रेलरची माहिती सांगणारा आहे.
यशराज फिल्म्सच्या ‘टायगर 3’ मध्ये सुपर एजंट टायगर उर्फ अविनाश सिंग राठौरच्या भूमिकेत सलमान खान परत आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा मेगास्टार सलमान पुढे म्हणतो की त्याला चित्रपटांमध्ये ‘लार्जर दॅन लाईफ हिरो’ बनणे आवडते.
सलमान म्हणतो, “मला ॲक्शन जॉनर आवडते, मला लार्जर दॅन-लाइफ ॲक्शन स्टार व्हायला आवडते. मजा आहे! मला मोठे अॅक्शन करायला आवडतात आणि ‘टायगर 3’ जितका मोठा अपेक्षित आहे तितका मोठा आहे. या चित्रपटाची कथा अशी आहे जी मला खूप आवडली आणि मला खात्री आहे की आम्ही या चित्रपटाद्वारे सर्वांना आश्चर्यचकित करू.”
मनीश शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ यावर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या रिलीज होणार आहे. टायगर का मेसेजमध्ये, सलमान उर्फ टायगर भारताचा शत्रू नंबर 1 म्हणून अडकल्यामुळे धोक्यात असल्याचे उघड झाले. हा व्हिडिओ चित्रपटाच्या कथानकाची मांडणी करतो ज्यामध्ये टायगर आपल्या शत्रूंना मारण्यासाठी जीवघेण्या मोहिमेवर कसा जातो हे दिसेल. टायगरला त्याच्या देशासाठी, त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या नावावर लागलेला कलंक दूर करायचा आहे.