tiger is back

  ‘टायगर 3’ चा नवीन प्रोमो ॲक्शनने भरलेला आहे.

    सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ (Tiger 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक अपडेट समोर येत आहेत. चित्रपटातील सलमानचा लूक, कतरिनाचा लूक, इमरान हश्मीचा लूक, टीझर आणि त्यानंतर या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक प्रोमो समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. अशातच या चित्रपटाचा नवीन धमाकेदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

    या प्रोमोमधील सलमान आणि इम्रानच्या डायलॉगने चाहत्यांची मनं जिंकली. ‘टायगर 3’ चा नवीन प्रोमो ॲक्शनने भरलेला आहे. फक्त सलमान-इम्रानच नाही तर कतरिनाही नव्या प्रोमोमध्ये जोरदार ॲक्शन करताना दिसत आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचा नव्या आणि धमाकेदार प्रोमोची सुरुवात चित्रपटातील भयानक खलनायक आतिशच्या भूमिकेतील इमरान हाश्मीच्या संवादाने होते. या ॲक्शन प्रोमोमध्ये आतिश सुपर एजंट टायगरला धमकावताना दिसत आहे. इम्रान त्याच्या खतरनाक लूकमध्ये टायगरसोबत फायटिंग करताना दिसत आहे. या धमाकेदार प्रोमोची सुरुवात आतिशच्या डायलॉगपासून होते. यात आतिश म्हणतो की, ‘अब मेरी बारी है, इस बार तुम्हारी हार है टायगर, दुनिया के नक्शे से हिन्दुस्तान का वजूद ही मिटा दूंगा मैं। वादा करता हूं टायगर’. यानंतर टायगर आणि झोयाचे धमाकेदार ॲक्शन सीन पाहायला मिळतात.

    पुढे मग टायगर देखील इम्रानला जबरदस्त उत्तर देतो. टायगर म्हणतो की ‘सब ठीक किया तुमने, एक बात भूल गए, जब तक टायगर मरा नहीं तब तक टायगर हारा नहीं।’ या प्रोमोमधील सलमान आणि इमरानच्या डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली.