टायगर ३ मधील पाहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांचे या गाण्याला खुप प्रेम मिळत आहे तर दुसरीकडे काहींनी सलमान खानला त्याच्या डान्ससाठी ट्रोलही केलं आहे.

    टायगर ३ : गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी टायगर ३ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर प्रेक्षकांना खुप आवडला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर ऍक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून पुन्हा ‘टायगर’ आणि ‘झोया’ची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येणार आहे. आता त्याच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानचे चाहते या गाण्याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. आता निर्मात्यांनी अरिजित सिंगच्या आवाजातील चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. ‘लेके प्रभु का नाम’ हे गाण्याचे टायटल आहे.

    ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्याचा टिझर रिलीज झाल्यानंतर चाहते या गाण्यासाठी उत्सुक होते. या गाण्यात पुन्हा एकादा टायगर त्याच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे तर कतरिनाने देखील तिचे डान्स कौशल्य दाखवले आहेत. ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्याला अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी आवाज दिला आहे. तर तब्बल नऊ वर्षानंतर अरिजीतने सलमानसाठी गाणे गायलं आहे. या गाण्याद्वारे दोघांमधील वादही मिटला आहे.

    सध्या हे गाण सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. एकीकडे सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांचे या गाण्याला खुप प्रेम मिळत आहे तर दुसरीकडे काहींनी सलमान खानला त्याच्या डान्ससाठी ट्रोलही केलं आहे. या गाण्याला सलमान-कतरिनाच्या केमिस्ट्रीशिवाय अरिजित सिंगने आवाजाने सर्वांना मोहित केलं आहे. टायगर ३ हा स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ ही जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तर यावेळी चित्रपटात खलनायक म्हणुन इम्रान हाश्मीची एंट्री झाली आहे. तर शाहरुख या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे. टायगर ३ दिवाळीच्या मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.