Tiger 3 (7)

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर 3 चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

  अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांची मुख्य भुमिका असलेल्या टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक झालं. या चित्रपटानं आतापर्यंत जगभरात जवळपास 463 कोटी कमावले आहेत. आता चित्रपटाबाबत नवी अपडेट समोर येत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफार्मवर रिलीज होण्याची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहेत. लवकरच ‘टायगर 3’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

  ‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. पहिल्या दिवशी ‘टायगर 3’ने 44.5 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. प्रदर्शित झाल्यानंतर एकोणिसाव्या दिवशी टायगर 3 ने 2.00 कोटींची कमाई केली आहे.

  ‘टायगर 3’ कोणत्या ओटीटीवर प्लॅटफार्मवर पाहता येईल

  यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचे डिजिटल अधिकार अ‍ॅमेझॉन प्राईमकडे आहेत. अ‍ॅमेझॉननं या चित्रपटांचे अधिकार हे मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. मात्र, यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार कारण सध्या  ‘टायगर 3’च्या ओटीटी रिलीज तारखेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

  कतरिनाने प्रेक्षकांचे मानले आभार

  चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहून कतरिनाने काही दिवसापुर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहत, हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले होते. कतरिना म्हणाली, धन्यवाद आणि चित्रपटगृहात टायगर 3 पहा.