
‘बॅटल ऑफ ब्रेथ्स’ मध्ये टायगर वेगळ्या भूमिकेत दिसणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
‘गणपत’नंतर अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आता वेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफचं एक नवीन पोस्टर (Tiger Shroff Poster) रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर टायगरचं स्केच आणि त्यावर ‘Tiger 11 #BattleofBreaths’, असं लिहिलेलं दिसतंय. या पोस्टरवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र हा प्रोजेक्ट नक्की काय आहे हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झालं आहे. चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनीही टायगरचं हे पोस्टर शेअर केलं आहे. (Battle Of Breaths)
View this post on Instagram
‘बॅटल ऑफ ब्रेथ्स’ मध्ये टायगर वेगळ्या भूमिकेत दिसणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोस्टरवरून एखाद्या योद्ध्याची भूमिका टायगर निभावणार असल्याचा अंदाज लावला जातोय. त्याच्या पोस्टरमधल्या लूकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. मात्र या प्रोजेक्टमध्ये नक्की काय घडणार, याची कथा कशी असणार हे लवकरच समोर येईल. याआधीचा टायगरचा ‘गणपत’ हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता त्याच्या नव्या प्रोजेक्टला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहावं लागेल.