‘गणपत’ ऑन फ्लोअर, टायगर श्रॉफ झळकणार मुख्य भूमिकेत!

२० सप्टेंबरपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची बहल यांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

    सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला टायगर श्रॉफ लवकरच आणखी एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बऱ्याच चित्रपटांना बसला तसा तो विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘गणपत’लाही सहन करावा लागला आहे. हळुहळू परिस्थिती सुधारत असल्यानं बहल पुन्हा ‘गणपत’च्या तयारीला लागले आहेत.

    २० सप्टेंबरपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची बहल यांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पूर्वतयारी झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचं समजतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘गणपत’ची सुरुवात करण्यासाठी विकास तयार आहे. या चित्रपटासाठी गणपत बनलेला टायगर बॉक्सिंग करताना दिसणार आहे.

    यात टायगरची मुंबैया स्टाइल पहायला मिळणार असल्याचं समजतं. यासाठी टायगरनं खास मार्शल आर्टससोबतच बॉक्सिंगच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षणही घेतलं आहे.