Titeeksha (3)

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेचा साखरपुडा पार पडला असून उद्या म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 त्यांच लग्न आहे.

  सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. काही दिवसापुर्वी अभिनेता अजिंक्य ननावरे अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नबंधनात अडकले. नुकतचं आपला लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबनही गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधली. आत पुन्हा एक सेलेब्रिटि जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच लग्न करणार आहे. रविवारी या दोघांचा गुपचूप साखरपुडा (Titeeksha Tawde Siddharth Bodke Engagement) उरकला. या सोहळ्याचे रोमँटिक फोटो  त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

  सिद्धार्थ आणि तितीक्षाने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत चाहत्यांना साखरपुडा झाल्याची बातमी दिली आहे. पहिला फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”Forever with my best friend”. सिद्धार्थ-तितीक्षाच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सारखपुड्यात तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. यावेळी दोघाची जोडी खुप सुंदर दिसत होती. सिद्धार्थ-तितीक्षाचं लग्न उद्या म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 रोजी आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

  मालिकेच्या शूटिंग सेटवर पडले प्रेमात

  तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं आहे. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता त्यांनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं आहे.

  तितीक्षाने सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो ‘दृश्यम 2’ या बॉलिवूडपटात झळकला होता.