अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात! चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. काही दिवसापुर्वी अभिनेता अजिंक्य ननावरे अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नबंधनात अडकले. नुकतचं आपला लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबनही गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधली. आत पुन्हा एक सेलेब्रिटि जोडी लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लग्नबंधनात (Titeeksha Tawde Sidhhart Bodake Wedding) अडकले आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सध्या समोर आलायं. चाहत्यांसोबत सेलेब्रिटीही त्यांना शुभेच्छा देत आहेत.

  तितिक्षा आणि सिद्धार्थने लग्नासाठी साध पण तितकाचं सुंदर लूक केला होता. त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

  मालिकेच्या शूटिंग सेटवर पडले प्रेमात

  तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं आहे. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता त्यांनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं आहे.