ब्रिटिश अभिनेता टॉम विल्किन्सन यांच वयाच्या 75 व्या वर्षी निधन, ऑस्करसाठी दोनदा मिळालं होतं नामांकन!

टॉम विल्किन्सनच्या कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे.

    हॅालिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे.  ब्रिटिश अभिनेता टॉम विल्किन्सन (tom wilkinson passes away) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. द फुल मॉन्टी मधील त्याच्या संस्मरणीय भूमिकेसाठी त्यांना जगभरात ओळखलं जातं. बाफ्टा-विजेता टॉम विल्किन्सन यांना मायकल क्लेटन आणि इन द बेडरुमसाठी दोनदा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होतं. त्यांच्या जाण्याने हॅालिवूड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

    टॉम विल्किन्सनच्या कुटुंबाने जारी केलं निवेदन

    अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “अत्यंत दुःखाने टॉम विल्किन्सनचे कुटुंब आपणा सर्वांना कळवू इच्छितो की टॉम विल्किन्सन यांचे 30 डिसेंबर रोजी घरी अचानक निधन झाले.” “त्याची पत्नी आणि कुटुंब देखील त्याच्यासोबत होते.

    टॉम विल्किन्सनचे सुपरहिट चित्रपट, टीव्ही मालिका

    टॉमने 1998 चा शेक्सपियर इन लव्ह, क्रिस्टोफर नोलनचा 2005चा बॅटमॅन बिगिन्स आणि 2011चा थ्रिलर मिशन: इम्पॉसिबल- घोस्ट प्रोटोकॉल यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या कारकिर्दीत 130 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा समावेश आहे, ज्यात द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल आणि गर्ल विथ अ पर्ल इयरिंग यांचा समावेश आहे.