sardar udham singh

‘सरदार उधम’(Sardar Udham Trailer Release) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

    ऑक्टोबरमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओ(Amazon Prime Video) ‘सरदार उधम’(Sardar Udham) हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात एका असाधारण युवकाची न सांगितली गेलेली कहाणी आहे. मातृभूमी आणि इथल्या लोकांविषयी असलेल्या प्रेमाखातर त्यानं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. नुकताच ‘सरदार उधम’(Sardar UdhamTrailer Release) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

    विक्की कौशल अभिनीत ‘सरदार उधम सिंह’ अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शूजीत सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. रॅानी लाहिरी व शील कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारत आणि जगभरात ऑक्टोबरमध्ये केवळ अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ‘सरदार उधम’ प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरदार उधमने हाती घेतलेल्या एका मोहिमेची झलक पाहायला मिळते.

    हा चित्रपट प्रतिशोधाच्या थरारक कहाणीसोबतच सरदार उधम या एका वीर व्यक्तीची वीरगाथा सांगणारा आहे. १९१९ च्या जालियनवाला बाग नरसंहारात क्रूरपणे मारले गेलेल्यांना देश कधीच विसरू शकणार नाही हे यात दाखवण्यात आलं आहे.

    ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानंतर ‘सरदार उधम सिंह’ या चित्रपटाद्वारे विकी पुन्हा एकदा देशवासियांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणार आहे. त्यामुळं या चित्रपटाबाबतचं कुतूहल दिवसेंदिवस वाढत आहे. ट्रेलरमुळे तर चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. विकीचे चाहते आपल्या लाडक्या कलाकाराच्या या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहात आहेत.