tula pahile re

‘तुला पाहिले रे’ (Tula Pahile Re) हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर शनिवार दिनांक २१ मे २०२२ रोजी येत आहे. दूरदर्शन मालिकेत ‘राजारामा’ची भूमिका गाजवणारे तरूण अभिनेते संग्राम समेळ (Sangram Samel) हे नायकाच्या भूमिकेत आहेत.

    आज वर्तमानात घडत असलेल्या राजकीय भूमिकांच्या घटनांचे पडसाद तरूणाईवर काय परिणाम करीत आहेत,(Marathi Drama) त्यावरचं एक अगदी ‘हल्कं फुल्कं’ नाटक ‘तुला पाहिले रे’ (Tula Pahile Re) हे व्यावसायिक रंगभूमीवर (Commericla Drama) शनिवार दिनांक २१ मे २०२२ रोजी येत आहे.

    ‘तुला पाहिले रे’ चं लेखन कांतीलाल कडू यांचं असून दिग्दर्शन ज्ञानेश यांचं आहे. देवेंद्र सरदार, अभिषेक पिंगळे यांनी नेपथ्याची धुरा सांभाळली आहे. तसेच प्रकाश योजना नितेश पाताडे यांची आहे, तर रोहित प्रधान यांचं पार्श्वसंगीत आहे.

    दूरदर्शन मालिकेत ‘राजारामा’ची भूमिका गाजवणारे तरूण अभिनेते संग्राम समेळ (Sangram Samel) हे नायकाच्या भूमिकेत आहेत. विभूती सावंत आणि गौरी व्याघ्रांबरे यांच्या यात महत्वपूर्ण भूमिका असून आदित्य वारंगे, देवेंद्र सरदार यांच्यासह लवंडे च्या आगळ्या वेगळ्या भूमिकेत ऐंशी वर्षांचा युवा अभिनेता अशोक समेळ आहे.