tunisha mother

तुनिषा शर्माच्या आईचा एक व्हिडिओ (Tunisha Sharma Mother Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तुनिषा आणि शिझानच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

  तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या (Tunisha Sharma Suicide) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच तुनिषा शर्माच्या आईचा एक व्हिडिओ (Tunisha Sharma Mother Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तुनिषा आणि शिझानच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

  शिझानने तुनिषाला धोका दिला. शिझानने तिला लग्नाचं वचन दिलं. शिझान आधीपासूनच एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता तरीही तो तुनिषासोबत नाते वाढवत होता. त्याने तुनिषाचा 3-4 महिने वापर केला आणि नंतर ब्रेकअप केलं. शिझानला शिक्षा मिळायला हवी. त्याला मोकळं सोडू नका. त्याने माझ्या मुलीचं नुकसान केलं आहे, असं तुनिषाची आई वनिताने सांगितलं आहे.

  तुनिषा शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तुनिशाची आई अनेकदा मालिकेच्या सेटवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवत होती. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15-20 मिनिटांपूर्वी तुनिषाच्या आईने तिची विचारपूस करण्यासाठी ड्रायव्हरला फोन केला होता. त्यावेळी ड्रायव्हरने सांगितलं की, तुनिषा शिझानसोबत असून दोघे गप्पा मारत आहेत. तसेच त्यांनी एकत्र जेवण केलं आहे.

  जर तुनिषाच्या आईने सांगितल्यानुसार जर ते एकत्र जेवत होते तर मग नंतरच्या 15-20 मिनिटांत नेमकं काय घडलं की त्यामुळे तुनिषाने आत्महत्या केली? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश मिळणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

  आत्महत्येच्या आधी तुनिषा आणि शिझान (Sheezan Khan) एकत्र जेवल्याचं आईने पोलिसांना सांगितलं आहे. आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याने आता दोघांच्याही मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. तुनिषा आणि शिझान यांचा 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती. ब्रेकअपमुळे दोघंही एकमेकांसोबत बोलत नसताना त्यांनी एकत्र जेवण कसं केलं असा सवाल उपस्थित झाला आहे.

  तुनिषा सब टीव्हीच्या (SAB TV) ‘दास्तान-ए-काबुल’ (Daastan- E- kabul) या शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तुनिषाने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.