tuz maz jamtay

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली. मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. एक साधा सरळ प्राध्यापक शुभंकर म्हणजेच अभिनेता रोशन विचारे, आशु म्हणजेच अभिनेत्री मोनिका बागुल आणि या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारी पम्मी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी मालिकेच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच नगरकर बाई म्हणजेच माधवी गोगटे, राजनंदिनीच्या भूमिकेत नुकतीच मालिकेत एंट्री झालेली पूर्व शिंदे यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळत आहे.

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली. मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. एक साधा सरळ प्राध्यापक शुभंकर म्हणजेच अभिनेता रोशन विचारे, आशु म्हणजेच अभिनेत्री मोनिका बागुल आणि या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारी पम्मी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी मालिकेच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच नगरकर बाई म्हणजेच माधवी गोगटे, राजनंदिनीच्या भूमिकेत नुकतीच मालिकेत एंट्री झालेली पूर्व शिंदे यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

मालिका सुरु झाल्यापसून अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स प्रेक्षकांनी मालिकेमध्ये पाहिले आशु – शुभूची भेट, त्यांची होऊ पाहणारी मैत्री, पम्मीची एंट्री, पम्मी आणि नगरकर बाईंमधील नोकझोक या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना पाहायला आवडत आहेत.  नुकताच या मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला आहे. त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर या दिवसाचं जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आलं. आता मालिका कोणत्या रंजक वळणावर पोहचणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना आहे आणि मालिकेमधील कलाकरांनी केक कटिंग करून आनंद साजरा केला.

tuz maz jamtay