टीव्ही अभिनेता कुणाल वर्माने रणवीर सिंगच्या न्यूड पोजची केली कॉपी, ट्रोलर्स म्हणाले…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या बोल्ड फोटोंमुळे चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत. या यादीत टीव्ही अभिनेता कुणाल वर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्याने सुद्धा न्यूड फोटोशूट केला आहे.

  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या बोल्ड फोटोंमुळे चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत. रणवीरची ही छायाचित्रे चाहत्यांमध्ये व्हायरल होत असताना काही लोक त्याचे कौतुक करत आहेत तर काहींना हा फोटोशूट आवडला नाहीये. अशा परिस्थितीत प्रकरण इथेच संपत नाही, तर काही टीव्ही आणि बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत जे रणवीरच्या न्यूड फोटोची कॉपी करत आहेत आणि त्याच्यासारखे फोटो काढत आहेत. या यादीत टीव्ही अभिनेता कुणाल वर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kunal Verma (@kunalrverma)

  कुणालने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड पोजची कॉपी करत सोशल मीडियावर त्याचे न्यूड फोटो पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या फोटोंमुळे कुणालही खूप ट्रोल होत आहे. कुणालने त्याच्या इंस्टाग्रामवर एक नग्न छायाचित्र पोस्ट केले.