वेब सीरीज ‘गुलक सीझन 4’ चं शूटिंग पूर्ण, निर्मात्यांनी पोस्ट केली शेअर; चाहत्यांचा वाढवला उत्साह!

'गुलक'च्या निर्मात्यांनी मालिकेच्या चौथ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. ही मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दैनंदिन जीवनातील सत्य दाखवते.

  प्रेक्षकांची आवडती वेब सिरीज ‘गुल्लक’ चा चौथा (Gullak seson 4) भाग लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मालिकेनं आपल्या सशक्त आणि कौटुंबिक कडू-गोड कथेद्वारे लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं. या मालिकेच्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता प्रेक्षक त्याच्या चौथ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी त्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे.

  रिलीजची तारीख लवकरच जाहीर करणार

  टीव्हीएफच्या ‘गुल्लक’ने त्याच्या बहुप्रतिक्षित चौथ्या सीझनचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ही मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दैनंदिन जीवनातील सत्य दाखवते. IMDb च्या जागतिक टॉप 250 टीव्ही शोच्या यादीत ते 83 व्या क्रमांकावर आहे. चौथा सीझन पूर्ण झाल्याच्या घोषणेने चाहत्यामध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, शोच्या प्रसारणाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

  चाहते उत्साहित

  दिग्दर्शक श्रेयांश पांडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘गुलक 4’चे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गुलक सीझन 4 ची शूटिंग संपली आहे. यासोबत त्याने ‘गुलक सीझन 4’ च्या संपूर्ण क्रू मेंबर्सचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘थकलेले शरीर, आनंदी आत्मा, हसरे चेहरे आणि खूप आठवणी. अशा प्रकारे आमची शुटींग संपली. या पोस्टनंतर चाहते खूप आंनदी झाले आणि त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत.

  कलाकार कोण?

  यापूर्वी ‘गुलक’ अभिनेता हर्ष मेयरने त्याच्या ‘गुलक’ सहकलाकारांसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘हे चार लोक एकत्र…? याचा अर्थ फक्त एकच असू शकतो. लोड करत आहे…पिगी बँक.’ श्रेयांश पांडे निर्मित, ही मालिका कुटुंबातील छोटे-छोटे सुख, दु:ख आणि भावना मांडते. जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मेयर ‘गुलक 4’ या मालिकेत त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत.