‘उलझ’चा टीझर रिलीज, फॉरेस्ट ऑफिसरच्या दमदार भुमिकेत दिसणार जान्हवी कपूर!

अमृता पांडे आणि विनीत जैन या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) एक नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘उलझ’.  बुधवारी ‘उलझ’चा टीझर रिलीज (Ulajh Teaser Released) करण्यात आला. हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला असेल हे टीझर पाहून स्पष्ट झाले आहे. जान्हवी कपूर एका तरुण मुत्सद्दी भूमिकेत दिसत आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते जान्हवीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. जान्हवीने गेल्या वर्षी उलझसाठी शूटिंग सुरू केले होते, ज्याचे अपडेट तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले होते.

  जान्हवी दिसणार वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत

  जान्हवी कपूरने ‘उलज’मध्ये भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे देशभक्तीवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा तरुण मुत्सद्दी सुहाना (जान्हवी कपूर) भोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी देश आणि तिच्या विरोधात रचलेले षडयंत्र यामधून बाहेर पडण्याची धडपड करताना  दिसणार आहे.

  ॲक्शन करताना जान्हवी

  ‘उलज’चा टीझर सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. टीझरची सुरुवात सारे जहाँ से अच्छा या गाण्याने होते. यानंतर जान्हवीचे पात्र पडद्यावर येते, जिची पोस्टिंग परदेशात आहे. त्याच वेळी, पार्श्वभूमीत एका माणसाचा आवाज ऐकू येतो, जो त्याच्या देशाशी विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतो. टीझरच्या शेवटी जान्हवी ॲक्शन करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  चित्रपटाची स्टारकास्ट

  ‘उलज’मध्ये जान्हवी कपूरशिवाय गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमृता पांडे आणि विनीत जैन या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  वर्कफ्रंट

  ‘उलज’ व्यतिरिक्त जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री वरुण धवनसोबत दिग्दर्शक शशांक खेतानच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसणार आहे.