aashram web series

आश्रमच्या तीन्ही सिझनला मिळालेल्या यशानंतर आता त्या चौथा सिझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

  ‘जपनाप, जपनाम’ चा जयघोष करत अभिनेता बॅाबी देओलनं आश्रम (Ashram) वेबसिरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात ऐन्ट्री केली. बघता बघता या वेबसिरिजनं प्रेक्षकाचं चांगलच मन जिकलं. त्याची लोकप्रियता पाहता मेकर्सने त्याचे आणखी तीन सिजन रिलीज केले. या तिन्ही सिझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता या वेबसिरिजच्या चौथ्या सिझनची प्रतिक्षा पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिरिजचा 4 सिजनही (Aashram Season 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  कधी बघायला मिळणार आश्रम 4

   ‘आश्रम’ या सिरिजचे आतापर्यंत 3 सिजन एमएक्स प्लेअरवर रिलिज करण्यात आले आहेत. आता त्याच्या चौथ्या सिरिजच्या रिलीज डेटविषयी माहिती सध्या समोर आली आहे. आता या सिरिजचा चौथा सिजन देखील येणार आहे.  चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आश्रम 4 च्या रिलीजबाबत एक अपडेट समोर आलीये. रिपोर्टनुसार, बॉबी देओलची ही सिरिज 2024 या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, या सिरिजच्या रिलीज डेटविषयी अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. तसेच निर्मात्यांनाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. त्यामुळे सध्या या सिजिनसाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे.

  तिन्ही सिझनला प्रेक्षकांची पंसती

  आश्रम वेबसिरिजचा पहिला सिझन 2020 मध्ये  एमएक्स प्लेअरवर रिलिज करण्यात आला. प्रेक्षकांना आश्रमच्या पहिल्या सिझनला पंसती दर्शवल्यानंतर त्याचा सीझन 2 आला. त्यानंतर तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता प्रेक्षक त्याच्या चौथ्या सिझनची वाट पाहत आहेत.
  प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसिरिजमध्ये बॉबी देओल मुख्य भुमिकेत आहे. त्याने बाबा निरालाच्या भूमिकेतून केलेलं कमबॅाक चांगलच चर्चेत आलं होतं. या वेबसिरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ या कलाकारांची मुख्य भूमिका आहे. या सीरीजमध्ये बॉबी देओलने अभिनेत्री त्रिधा चौधरीसोबतही अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत.