urfi javed

उर्फीने तिचं सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

    आपल्या विचित्र कपड्यांनी आणि बेधडक बोलण्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद (Urfi Javed ) सध्या चर्चेत आहे. उर्फी जावेदचं इंन्टाग्राम अंकाऊनंट सस्पेंड करण्यात आलं आहे. उर्फीने स्वत स्क्रिनशॅाट शेअर करत याबाबत माहिती दिली. या नंतर मात्र, नेटकरी वेगवेगळे कमेंट करताना दिसत आहे.

    नेमका प्रकार काय

    नेहमी अतंरगी कपड्यांवरुन उर्फीला ट्रोल करण्यात येतं. तरीही उर्फी कुणाचीही पर्वा न करता तिला हवं तेच करते. यामुळे मात्र तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. अशातच आता उर्फीबद्दल नवी माहिती समोर आली आहे. उर्फीने तिचं सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मात्र काही वेळातच उर्फीने आता तिचं अकाऊंट रिकवरही केलं आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर मेटाने दिलेली माहिती दिसत आहे. कम्यूनिटी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्याचं यात म्हटलं आहे.

    उर्फीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव

    उर्फी जावेदच्या पोस्टवर या नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे अतरंगी कंमेट्स केले आहेत. एकाने लिहिलं आहे,”ही गंभीर बाब आहे”. एका क्रिएटरसाठी सोशल मीडिया अकाऊंट खूप महत्त्वाचं असतं. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खूप चांगला निर्णय, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात”. तर काहींनी मात्र ‘मिस यू उर्फी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.