राहुल गांधींसोबत ट्रोल केल्यामुळे उर्फी जावेद भडकली! म्हणाली, ‘तुम्ही राजकारणी माझ्या कपड्यांवर….’

    मुंबई :भारतातील इतर राज्यांसह दिल्ली येथे देखील हंडीचा तडाखा वाढत आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या दिल्ली येथे पोहोचली आहे. या यात्रे दरम्यान कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी कोणतेही उबदार स्वेटर न घालता केवळ एका टी शर्टवर दिसत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी ते स्वतः किती सक्षम आहेत हे दर्शवण्यासाठी स्वेटर न घातल्याचे बोलले जात आहे. अशातच राहुल गांधींना कपड्यांवरून ट्रोल करता करता काहींनी यावादात सोशल मीडिया स्टार आणि बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असलेली उर्फी जावेद गिला देखील ट्रोल केले. त्यावरून उर्फी फारच भडकली.

    कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी फक्त टी शर्टवर आहेत तेव्हा ‘राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतर भाजप नेते दिनेश देसाई यांनी ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर उपहासात्मक ट्वीट करण्यात आलं आहे. “जर थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी”, असं देसाई यांनी म्हटल आहे. त्यांच्या या ट्विटनंतर उर्फीने ट्विट करत देसाई यांच्यावर पलटवार केला आहे.

    काय म्हणाली उर्फी?

    “हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कसी करू शकतो आपण?” असा सवालच उर्फीनं विचारला आहे. उर्फीच्या या ट्विटनंतर देसाई यांनी आणखी एक ट्विट करत तिला उत्तर दिले आहे. त्यावर पुन्हा उत्तर देत भाजपा नेत्याने म्हंटले, “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाही”, असं ट्वीट दिनेश देसाई यांनी केलं आहे.