
आता उर्फीने आता अशा एका वस्तूपासून ड्रेस तयार केला आहे की ते पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या डोक्याला हात लावाल.
उर्फी जावेद : उर्फी जावेद नेहमीच तिच्या हटके आणि आगळ्यावेगळ्या ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही कधी काय फॅशन करेल याचा नेम नाही. त्याचबरोबर तिच्या ड्रेसिंगमुळे ती बऱ्याच वेळा ट्रोल सुद्दा होते. तिने नुकतीच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली होती त्यानंतर ती चर्चेत आली. उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते तिने कधी सायकलची चैन तर कधी कंगवा अशा अनेक वस्तूंचा वापर करुन ड्रेस तयार केले आहेत. परंतु आता उर्फीने आता अशा एका वस्तूपासून ड्रेस तयार केला आहे की ते पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या डोक्याला हात लावाल.
उर्फीने तयार केलेल्या या ड्रेसची प्रचंड चर्चा सुरु आहे आणि या ड्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आता उर्फीनं चक्क सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करुन ड्रेस तयार केला आहे. तिने रस्त्यावरून ही एक एक करत ही थोटकं गोळा केली आहे. याचा वापर करत तिने आपला नवा ड्रेस तयार केला आहे. उर्फीच्या या नवीन ड्रेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फीनं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की उर्फी रस्त्यावर सिगारेटच्या थोटकं गोळा करत आहे. यानंतर उर्फी ती एक-एक करून ही सर्व थोटकं तिच्या ड्रेसला जोडली आणि काही वेळातच तयार झाला तो उर्फी जावेदचा नवा ड्रेस
उर्फीचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यावर चाहत्यांनी खुप खूप कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. आत्तापर्यंत उर्फी जावेदने पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेस बनवला आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.