urfi javed and chitra wagh

उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी एक व्हिडिओ(Urfi Javed Viral Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद अजुनही थांबलेला नाही. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रारही केली. तसेच न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं.महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी एक व्हिडिओ(Urfi Javed Viral Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Uorfi (@urf7i)

  उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे टीकेची शिकार होत आहे. ट्रोल करणाऱ्यांची पर्वा न करता उर्फी प्रत्येक वेळी तिच्या नवीन शैलीने लोकांना आश्चर्यचकित करते. कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांवर टीका करत, राजकारण्यांना काही काम नाही का, असा सवाल उर्फीने केला आहे. आता र्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हातात हातकडी घालून काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फी लिहिते की, “तुम्हा सर्वांना मला हँडकफमध्ये पाहायचे होते, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण केली.” काही चाहते उर्फीच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत तर काही लोक टीका करत आहेत.

  दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाच्या कामावरही आक्षेप घेतला. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे. या नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आले आहे. 1993 कलम 92 (2) (3) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. खुलासा सादर करा अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असं सांगण्यात आलं आहे.