urvashi rautela

उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बघण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अहमदाबाद येथे गेली होती. त्यावेळी तिचा 24 कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन (iphone Theft) चोरीला गेला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तिने तक्रार दाखल केली होती. ता चोराने उर्वशीला मेल केला आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला चोराने ईमेल केला आहे. याबाबत उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टेट्स टाकून माहिती दिली.मागणी पूर्ण केली तरच फोन परत करेन, असे चोराने मेलमध्ये म्हटले आहे. (Urvashi News)

    urvashi rautela phone updates

    उर्वशीला Groww Traders नावाने मेल आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट उर्वशीने शेअर केला आहे. मेलमध्ये असं म्हटलेय की, तुमचा फोन माझ्याजवळ आहे. तुम्हाला फोन परत हवा असेल तर माझी मदत करावी लागेल. माझ्या भावाला कॅन्सर आहे, त्याचा उपचार करा. चोराच्या या मेलला उर्वशीने थम्स-अप असा रिप्लाय दिलाय.

    उर्वशीने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. पोलिस चोराला पकडू शकतात, असे नेटकऱ्यांनी उर्वशीला सांगितले.

    उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बघण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. उर्वशीने ट्विटरवर ही माहिती दिली. उर्वशीने अहमदाबाद पोलिसांना टॅग केले आणि लिहिले की, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेटचा आयफोन हरवला आहे. कृपया, कोणाला सापडल्यास, कृपया ताबडतोब संपर्क साधा.” तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट  शेअर केली होती.