Usha Mangeshkar in saregama little champ

येत्या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्स(Saregamapa Little Champs) या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर (Usha Mangeshkar In Saregamapa Little Champs)हजेरी लावणार आहेत.

  ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’(Saregamapa Little Champs Update)च्या नवीन पर्वाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व निरागस स्पर्धकांइतकाच त्यांचा गोड परफॉर्मन्स या शोमध्ये पहायला मिळतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही, तर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारदेखील या छोट्या गायकांचे फॅन(Fan Of Saregamapa Little Champs Contestants) झाले आहेत.

  या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांसोबत नावाजलेल्या गायक-संगीतकारांनाही निमंत्रित केलं जातं आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं. त्यांच्याकडून मिळणारं मार्गदर्शन चिमुकल्या गायकांसाठी मोलाचं ठरत आहे.

  Usha Mangeshkar

  येत्या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्स(Saregamapa Little Champs) या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर (Usha Mangeshkar In Saregamapa Little Champs)हजेरी लावणार आहेत. त्यांनी सर्व लिटिल चॅम्प्सचं केवळ कौतुकच केलं नाही, तर लतादीदींना हा एपिसोड पाहण्याची विनंती देखील केली आहे.

  saregama little champ contestants

  उषा मंगेशकर यांच्यासोबतच माईंड रीडर केदार परुळेकर देखील या मंचावर उपस्थित होते. उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत लिटिल चॅम्प्सनं एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले. या आठवड्यात कोणाला गोल्डन तिकीट मिळणार ? कोण हा मंच सोडून जाणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.