Indian Idol marathi

गायिका उत्तरा केळकर आणि शास्त्रीय संगीतातल्या सूरसम्राज्ञी आरती अंकलीकर-टिकेकर (Uttara kelkar And Aarti Anklikar In Indian Idol Marathi) ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या मंचावर येणार आहेत.

    सोनी मराठी  (Sony Marathi) वाहिनीवर ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होत असून, ती भाषा मराठी असल्यानं रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेनं केली आहे. शोचे परीक्षक अजय-अतुल (Ajay -Atul) असल्यानं ‘इंडियन आयडॉल’ मराठीची रंगत वाढत आहे. आगामी आठवड्यात शास्त्रीय आणि सुगम संगीताची मैफील रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

    ‘चिकमोत्यांची माळ…’, ‘खोप्यामध्ये खोपा…’, ‘बंधू येईल माहेरी न्यायला…’ यांसारखी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या गायिका उत्तरा केळकर आणि शास्त्रीय संगीतातल्या सूरसम्राज्ञी आरती अंकलीकर-टिकेकर (Uttara kelkar And Aarti Anklikar In Indian Idol Marathi) ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या मंचावर येणार आहेत.

    उत्तराताईंनी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं असून, रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमांतूनही त्या आपली कला सादर करतात. अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता गाऊन त्यांना जनमानसात अधिक लोकप्रिय करण्याचं काम उत्तरा केळकर यांनी केलं आहे. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती अशा जवळपास दहा ते बारा भाषांमध्ये चारशेहून अधिक चित्रपटगीते गायली आहेत.

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांनी ‘सरदारी बेगम’, ‘अंतर्नाद’, ‘दे धक्का’, ‘एक हजाराची नोट’ इत्यादी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. आरती यांची मुलगी स्वानंदी टिकेकर ‘इंडियन आयडॉल मराठी’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. आरतीताईंचं येणं हे स्वानंदीसाठी एक सरप्राईज होतं.