varun dhavan and ananya pandey in call me bae

धर्माटिक एंटरटेनमेंट प्रोडक्शनची ‘कॉल मी बे’ही सीरीज करण जोहर, अपूर्व मेहता तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सोमेन मिश्रा द्वारा निर्मित आणि कॉलिन डी कुन्हाद्वारा दिग्दर्शित आहे. दरम्यान, इशिता मोईत्राद्वारा क्रिएटेड, ज्यांनी समीना मोटलेकर आणि रोहित नायर यांच्यासह सीरिजचं सह-लेखन देखील केलं आहे.

‘प्राइम बे’ आणि प्राइम व्हिडिओच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कॉल मी बे’ सीरिजबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वरुण धवन आणि अनन्या पांडे ‘कॉल मी बे’मध्ये एकत्र झळकणार आहेत. वरुणने या सीरिजच्या प्रोमोमध्ये आगामी अमेझॉन ओरिजनल स्क्रिप्टेड सीरिज ‘कॉल मी बे’मधील अनन्या पांडेची ‘बे’ म्हणून ओळख करून दिली आहे.

या प्रोमो व्हिडिओमध्ये, अनन्या वरुण धवनला फॅशन आणि कपड्यांबद्दल माहिती देताना दिसत आहे. या सीरिजचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे.

अरबपति फॅशनिस्टा ‘बे’ (अनन्या पांडेद्वारा अभिनीत)ला तिच्या अतिश्रीमंत कुटुंबाने सेलसियस घोटाळ्यामुळे नाकारले आहे. पहिल्यांदाच तिला स्वतःचा बचाव करायचा आहे. या प्रवासात, ती स्टिरियोटाइपवर मात करते. ती पूर्वधारणा तोडते आणि आपण खरोखर कोण आहोत याचा शोध घेते.

धर्माटिक एंटरटेनमेंट प्रोडक्शनची ‘कॉल मी बे’ही सीरीज करण जोहर, अपूर्व मेहता तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सोमेन मिश्रा द्वारा निर्मित आणि कॉलिन डी कुन्हाद्वारा दिग्दर्शित आहे. दरम्यान, इशिता मोईत्राद्वारा क्रिएटेड, ज्यांनी समीना मोटलेकर आणि रोहित नायर यांच्यासह सीरिजचं सह-लेखन देखील केलं आहे. अशातच, ‘कॉल मी बे’ आपल्या रिलीजनंतर 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होणार आहे.