वरुणच्या चित्रपटाचं शूटिंग पुर्ण, लवकरच या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार!

दिनेश विजान प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. यात वरुणच्या जोडीला क्रिती सनोन आणि अभिषेक बॅनर्जी आहेत. हा चित्रपट पुढल्या वर्षी १४ एप्रिलला प्रदर्शित करण्याची योजना आहे.

  या महिन्याच्या २६ तारखेपासून आणखी एका चित्रपटाचं काम नव्या जोमानं सुरू होणार आहे. मागील काही दिवसांपासून वरुण धवन आपल्या ‘भेडीया’ या आगामी महत्त्वपूर्ण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तो जय्यत तयारी करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी झळकल्या, पण लॅाकडाऊनमुळं या चित्रपटाच्या कामाला ब्रेक लागला होता. आता कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन करत शूट पूर्ण करण्यासाठी वरुण सज्ज झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  वरुणनं १९ एप्रिललाच ‘भेडीया’चं अरुणाचल प्रदेशमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं ९० टक्के शूट रिअल लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. यात दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगरांवर आणि जंगलात जास्त शूट आहे. आता २६ जूनपासून वरुण मुंबईतील शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिनेश विजान प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. यात वरुणच्या जोडीला क्रिती सनोन आणि अभिषेक बॅनर्जी आहेत. हा चित्रपट पुढल्या वर्षी १४ एप्रिलला प्रदर्शित करण्याची योजना आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  या चित्रपटासाठी वरुणनं बरीच मेहनत घेतली असल्यानं त्याच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याचं नवं रूप पाहण्याची उत्सुकता लागली आहे.