वरुण धवन आणि नताशाच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करून दिली गोड बातमी!

अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे जोडपे लवकरच पालक होणार आहे. खुद्द अभिनेत्याने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

    नुकतचं अभिनेता विक्रांत मेसीच्या घरात बाळाच आगमन झालं आहे. त्याच्या घरात आंनदाच वातावरण आहे. फॅन्ससह सेलेब्रिटींनीही विक्रांतला शुभेच्छा दिल्या आहेत. आता बॅालिवूडमधील आणखी एका अभिनेत्याच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) हे जोडपंही लवकरच पालक होणार आहे. स्वत: वरुणने ही माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

    चाहते करत आहेत अभिनंदन

    या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले, डॅडी आणि मम्मी नंबर 1. मलायका अरोराने लिहिले, अभिनंदन. क्रिती सेनन आणि जान्हवी कपूर यांनी अनेक काळ्या रंगाचे हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. नेहा धुपियाने लिहिले, तुमचे अभिनंदन.  सर्वोत्कृष्ट हूडमध्ये तुमचे स्वागत आहे. वाणी कपूरने लिहिले, अभिनंदन.

    वरुण आणि नताशाने 2021  मध्ये बांधली लग्नगाठ

    वरुण आणि नताशाने 24 जानेवारीला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने 2021 मध्ये मुंबईपासून दूर असलेल्या अलिबागमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या जोडप्याच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. वरुणने नताशाला 4 वेळा प्रपोज केले आणि नताशाने त्याला अनेकवेळा नकार दिला, पण अभिनेत्यानेही हार मानली नाही. शेवटी नताशाने वरुणचे प्रेम समजून होकार दिला.