
रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, “शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!”
गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा ‘वेड’(Ved In 50 Crore Club) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे उच्चांक गाठत आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. या चित्रपटाने 18 जानेवारीपर्यंत तब्बल 50 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल रितेश देशमुख आणि जिनिलीयाने (Genelia Deshmukh) प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, “शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!”
View this post on Instagram
वेड चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 20.18 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे रितेशने लिहिलंय. अशा प्रकारे आतापर्यत चित्रपटाचा एकूण कमाई 50 कोटीवर पोहोचली आहे. रितेश देशमुखचा वेड हा मराठी चित्रपट एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही आहे. या चित्रपटाने ‘सैराट’च्या नावे असलेला एका दिवसातला सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडला आहे. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
‘वेड’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय केला होता. ज्यामुळे सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पसरले होते. पहिल्या आठवड्याची कमाई पाहून अनेकांना वाटले की दुसऱ्या वीकेंडलाही त्याची कमाई चांगली होईल, मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये वेडने जी कमाई केली त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक सकारात्मक वातावरण तयार झाले. आता या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम केला आहे. वेड आगामी काळात 100 कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवेल का ? हा प्रश्न आता रितेश आणि जिनिलिया देशमुखच्या चाहत्यांना पडला आहे.