ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; कर्करोगाशी झुंज संपली, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

अभिनेत्री भैरवी वैद्य या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते मात्र, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालावली.

    चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांच आज निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, अखेर उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. भैरवी या गेल्या 45 वर्षापासून मनोरंजनक्षेत्रात सक्रीय होत्या.  त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

    भैरवी वैद्य यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये केलं काम

    भैरवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम  केलं आहे. हिंदीसोबत त्यांनी गुजराती  चित्रपटांमध्ये भैरवी यांनी काम केलं. नीमा डेन्जोंगपा या मालिकेमध्ये त्यांनी पुष्पा ही भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच चोरी चोरी चुपके चुपके या सलमान खानच्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल या चित्रपटामधील जानकी ही भूमिका साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये देखील भैरवी वैद्य यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

    कलाकारांनी व्यक्त केला शोक

    भैरवी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात भैरवी यांच्यासोबत प्रतीक गांधीनं काम केलं. भैरवी यांच्या निधनानंतर प्रतीकनं भैरवी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यानं सांगितलं, ” व्हेंटिलेटर चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्यात खूप छान बॉन्डिंग होते. मी त्यांना माझ्या लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.

    तसेच भैरवीबद्दल बोलताना त्यांच्यासोबत काम केलेला कलाकार बाबुल भावसारने एका वृत्तसंस्थेला सांगितलं, “काही वर्षांपूर्वी मी त्यांच्यासोबत एका नाटकामध्ये केलं होतं. त्या खूप छान व्यक्ती होत्या आणि त्यांच्या नाटकातील पात्रंही तशीच होती. खऱ्या आयुष्यात त्यांचे कुणाशी भांडण झालं तरी त्या फक्त प्रेमानेच बोलत होत्या असं वाटत होतं.”