ज्येष्ठ अभिनेत्री जयाकुमारीची किडनी झाली खराब, मदतीची याचना

दक्षिण अभिनेत्री जयकुमारी ही 1960 आणि 1970 च्या दशकात तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जात होती. किडनीशी संबंधित आजारामुळे ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. ती तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहे. अभिनेत्री सध्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त असून तिची प्रकृती खराब आहे.

    जयाकुमारीला चेन्नईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. रिपोर्ट्सनुसार तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे ती आपला मुलगा रोशनसोबत राहत आहे. जयाकुमारी यांच्या पतीचे नाव नागपट्टीनम अब्दुल्ला होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

    वृत्तानुसार, जयाकुमारी सध्या तिच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागत आहेत कारण त्यासाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो. तेवढे पैसे देण्याच्या स्थितीत ती नाही. तिला आशा आहे की, इंडस्ट्रीतील लोक तिला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येतील. यापूर्वी चिरंजीवी आणि रजनीकांत सारख्या अभिनेत्यांनी नेहमीच त्यांच्या अनुभवी सहकलाकारांना मदत केली, जे कठीण काळात होते.

    अभिनेत्रीने 1968 मध्ये मल्याळम चित्रपट कलेक्टर मालथीद्वारे पदार्पण केले. तिने फुटबॉल चॅम्पियनमध्ये प्रेम नझीर, नूरुक्कू नूरू मधील जयशंकर आणि मन्निना मागा मधील डॉ राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनय केला. तिने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. एंजिरिंदो वंदल, हरमाना, नुत्रुक्कू नुरू, अनाथाई आनंदन यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्रीने लोकप्रियता मिळवली आहे.