ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर कोसळला दुखाचा डोंगर, पतीचं वृद्धपकाळानं निधन!

    गेल्या काही दिवसात मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार हे जग सोडून गेले. आता मनोरंजन सृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दशकापासून हिंदी मराठी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचं वृद्धपकाळानं निधन झालं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे मागील अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (28 मार्च) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

    सोशल मीडियावरुन दिली माहिती

    अभिनेत्री शुभा खोटे यांनी त्यांचे पती दिनेश बलसावर यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी पतीसोबचे फोटो शेअर करत त्यांच्याबद्दल भावनिक संदेशही लिहीला आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. ’60 वर्षे आम्ही एकमेकांना म्हणत आलो की, सोबत म्हातारे होऊयात, अजून आपल्या आयुष्यात आणखी सर्वोत्तम गोष्ट यायची आहे. असं त्यांनी लिहिलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shubha Khote (@shubhakhote)

    शुभा खोटे आणि दिनेश बलसावर हे 1960 मध्ये विवाहबद्ध झाले होते. दिनेश बलसावर हे एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. त्याशिवाय, त्यांनी मराठी चित्रपट ‘चिमुकला पाहुणा’ मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती शुभा खोटे यांनी केली होती.