ज्येष्ठ मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश, सहाय्यक भूमिकेतून मिळाली होती ओळख

मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते (Marathi Veteran Actor) भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे शनिवारी पहाटे कोल्हापुरातील (Kolhapur) राहत्या घरी निधन झाले (Passes Away). ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपट केले होते. यातील काही हिंदी चित्रपट होते तर बहुतांश मराठी चित्रपट होते.

कोल्हापुरातील चित्रपट कार्यकर्ते अर्जुन नलावडे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांचे निधन झाले.”

भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक नाटके आणि चित्रपटांमध्ये केले होते काम

आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक नाटके, दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केल्या. १९६५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकनाट्यातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी स्वतःला तमाशा या महाराष्ट्रातील पारंपारिक रंगभूमीचे उत्पादन म्हटले. कुलकर्णी यांनी सोंगाड्या, पिंजरा आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिकेतून ठसा उमटवला.

भालचंद्र कुलकर्णी गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रापासून होते दूर

गेल्या चार-पाच दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र कुलकर्णी यांनी असला नवरा नको गं बाई, पिंजरा, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, थरथराट, जावयाची जात, धुमधडाका, सोंगाड्या, थरथराट अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. भालचंद्र कुलकर्णी हे त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी ओळखले जातात.पण गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते काही वर्षे सचिव तर काही वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता निधन झाले असून दुपारी १२ वाजता कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.