
‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट आता १३ जानेवारी २०२३ ला रिलीज (Victoria Release Date) होणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांकडून आणि निर्मात्यांकडून नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
‘व्हिक्टोरिया’(Victoria) या मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट १६ डिसेंबर २०२२ला रिलीज होणार होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट अर्थात प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट आता १३ जानेवारी २०२३ ला रिलीज (Victoria Release Date) होणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांकडून आणि निर्मात्यांकडून नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘व्हिक्टोरिया’ हा मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी बनलेला चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षाशिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे आणि याच दृष्टिकोनातून आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत.व्हिक्टोरियाचे रहस्य आता १३ जानेवारी २०२३ ला उलगडणार…रसिक प्रेक्षक हो असेच प्रेम असू द्या! #व्हिक्टोरिया १३ जानेवारी पासून सिनेमागृहात…
View this post on Instagram
व्हिक्टोरिया हा एक हॉरर चित्रपट आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तज्ञांच्या मते हॉलीवूडच्या ‘अवतार’ मुळे मराठी व्हिक्टोरियाला स्क्रीन मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या सिनेमाचं नुकसान होऊ नये,लोक एक उत्तम कलाकृती पाहण्याला मुकू नयेत असा विचार करुन व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी ‘व्हिक्टोरिया’चं प्रदर्शन पुढे ढकलल्याचं कळत आहे. मात्र याबाबत निर्मात्यांकडून तसा अधिकृत खुलासा आलेला नाही. चित्रपटाच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून अवतारमुळे रिलीज डेट पुढे ढकलल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.