रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवरील व्हिडीओ आला समोर, अयोध्या दाखवण्यासाठी खर्च केले ‘इतके’ कोटी रुपये!

सध्या रामायणच्या शूटिंग सेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटात अयोध्या दाखवण्यासाठी सेटवर मेहनत घेतली जात आहे.

    सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरू झाले आहे. दररोज यासंदर्भातील काही बातम्या समोर येत आहेत. रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार असून चित्रपटाची भव्यता दिर्शवणारा सेटवरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या सेटची किंमत 11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

    चित्रपटाचं शूटिंग सुरू

    ‘रामायण’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं आहे. चित्रपटाचा सेटही खूप मोठा आणि महागडा असल्याचा अंदाज लावला जात आहे. सध्या रामायणच्या शूटिंग  सेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटात अयोध्या दाखवण्यासाठी सेटवर मेहनत घेतली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे.

    चित्रपटाच्या क्रूने हा शेअर केला व्हिडिओ

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ चित्रपटाच्या टीमच्या सदस्याने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अयोध्येचा सेट आहे, जो खूप भव्य दिसतोय. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या खांबांवर पारंपरिक कलाकृतीही दिसत आहेत. याशिवाय व्हिडिओमध्ये चित्रपटाचे क्रू मेंबर्स कॅमेरा आणि इतर उपकरणे घेऊन जाताना दिसत आहेत.