आपल्या लाडक्या हिरोच्या चित्रपटाचा ट्रेलर बघण्यासाठी फॅन्सने केली गर्दी, थिएटर्सच्या काचा फोडून चित्रपटगृहात मिळवला प्रवेश!

पवन कल्याण वकील साहब या सिनेमाच्या निमित्तानं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन करत आहे. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या 'पिंक' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात पवनसह प्रकाश राज यांचीही मुख्य भूमिका आहे.

    दक्षिण भारतामध्ये आपल्या कलाकाराच्या चित्रपट प्रदर्शनाच्यावेळी अनेकदा त्याच्या चाहत्यांचा उत्साह अनियंत्रीत होतो. अभिनेता पवन कल्याण याच्या वकील साहब या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी देखील हाच प्रकार घडला. विशाखापट्टणम येथील संगंम शरथ या टॉकीजमध्ये हा प्रकार घडला. या सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाच्या वेळी टॉकीजच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी अनियंत्रित झाली. लोकांनी काचा फोडून थेएटर्समध्ये प्रवेश केला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

     

    होळीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील काही टॉकीजमध्ये दुपारी चार वाजता वकील साहब या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार होता. विशाखापट्टणमध्ये पवन कल्याणच्या फॅन्सनी सकाळपासूनच टॉकीजच्या बाहेर गर्दी केली होती. त्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या फोटोची पूजा केली, तसंच नारळाचा अभिषेक केला. ट्रेलर प्रदर्शित होण्याची वेळ आली त्यावेळी हे सर्व फॅन्स अनियंत्रित झाले. त्यांच्या गोंधळात टॉकीजच्या काचा फुटल्या. त्यानंतर हे सर्व फॅन्स ट्रेलर पाहण्यासाठी टॉकीजमध्ये घुसले.

    पवन कल्याण वकील साहब या सिनेमाच्या निमित्तानं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन करत आहे. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘पिंक’ या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात पवनसह प्रकाश राज यांचीही मुख्य भूमिका आहे.