Refusing the minister for dinner cost actress Vidya Balan dearly; Shooting of 'Lioness' movie stopped

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बॅालिवूड इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बालनने नेपोटिज्मवर भाष्य केलं आहे.

  अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi)  यांचा हे दोन्ही स्टार्स सध्या चर्चेत आहे. त्यांचा आगामी चित्रपट दो और दो प्यार आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. फॅन्सही तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं विद्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या (The Indian Express) ‘एक्सुप्रेसो’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात हजेरी लावली होती. यावेळी तीने आयुष्य, करिअर, स्ट्रगल आणि बॉक्स ऑफिससह विविध विषयांवर भाष्य केलं. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बाललने नेपोटिज्मवर  (Vidya Balan On Nepotism) बद्दल वक्तव्य केलं आहे. तिचं हे वक्तव आता चांगलच चर्चेत आलं आहे.

  काय म्हणाली विद्या?

  बॉलिवूडमधील नेपोटिज्मवर बोलताना विद्या बालन म्हणाली,”मी माझं काम उत्तम करत असून या कामातून मला समाधान मिळत आहे. मुळात इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. कोणीही कधीही इंडस्ट्रीत येऊन काम करू शकतो. मी आनंदी असून नेपोटिज्मकडे लक्ष देत नाही”.

   मला स्वत:वर प्रेम करायला आवडतं – विद्या

  बॉडी शेमिंगबद्दल बोलताना विद्या म्हणाली,”स्वत:वर प्रेम करायला मला आवडतं. बॉडी शेमिंगची शिकार झाली असून आता मात्र मी स्वत:कडे जास्तीत जास्त लक्ष देते. मी माझ्या पतीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. मी काय कपडे परिधान करायचे हा माझा प्रश्न आहे. मी कधीच लोकांचा विचार करत नाही”. कमिटेड रिलेशनशिपमध्ये सेक्स, पैसा या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, याबद्दलही तिने भाष्य केलं.

   ‘दो और दो प्यार’ कधी होणार रिलीज?

  प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.