Vidyadhar Karmarkar passed away in Mumbai

उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून प्रसिद्ध असलेले विद्याधर करमरकर(Vidyadhar Karmarkar Passed away ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे.

    मुंबई : उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून प्रसिद्ध असलेले विद्याधर करमरकर(Vidyadhar Karmarkar Passed away ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे.

    दरवर्षी दिवाळीत टीव्हीवर येणाऱ्या ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी ‘अलार्म काकां’ची भूमिका साकारली होती. यासोबतच इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केलं आहे.

    याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे.