money heist

‘मनी हाइस्ट’(Money Heist)च्या पाचव्या सिझनचा शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मनी हाइस्टचा शेवटचा भाग म्हणजेच व्हॉल्यूम २ हा ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

    नेटफ्लिक्सवरील (Netflix)सर्वात लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे ‘मनी हाइस्ट’(Money Heist). ‘मनी हाइस्ट’ शो चा पाचवा सिझन ३ सप्टेंबरला रिलीज झाला होता. हा सिझन शेवटचा सिझन(Money Heist Last Season) म्हणून घोषित करण्यात आला असला तरी मेकर्सनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून धरली होती. या सिझनचे दोन भाग करण्यात आले होते. ज्यातील दुसरा आणि शेवटचा भाग म्हणजेच व्हॉल्यूम २ हा ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

    पाचव्या सिझनचा शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाचव्या सिझनच्या दुसऱ्या भागात अखेर प्रोफेसर सगळ्यांसमोर येत बँकेत अडकलेल्या आपल्या टीमला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मागीत भागात टोक्योचा मृत्यू झाला आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये र्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इत्जियर इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे हे कलाकार झळकतील.

    मेकर्सनी पाच भागांच्या नावांसह कलाकारांचे फोटोही शेअर केले आहेत. यातील सहाव्या एपिसोडला ‘एस्केप व्हॉल्व’ असं नाव देण्यात आलंय. ज्यात रिओच्या हातात बाझुका दिसतेय. यात तो टोकियोच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय.सातव्या एपिसोडचं नाव ‘विशफुल थिंकिंग’ असं आहे. हा एपिसोड बर्लिन आणि पालेर्मोच्या फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार असेल. “द थिअरी ऑफ एलिगन्स” या आठव्या भागात टीममधील काही आनंदी क्षण पाहायला मिळत आहेत. नवव्या भागाचं नाव ‘पिलो टॉक’ तर दहाव्याचं नाव ‘ए फॅमिली ट्रेडिशन’ असं आहे.

    येणाऱ्या एपिसोडमध्ये आता नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या ३ तारखेला प्रेक्षकांना पडलेले अनेक प्रश्न अखेर सुटणार आहेत.