विजय देवराकोंडा ‘Liger’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला पाटण्यात, पहा फोटो

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी 'लाइगर' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. त्याचवेळी, अभिनेता त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट 'Liger' च्या प्रमोशनसाठी बिहारमधील पाटणा येथे पोहोचला आहे.

  साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी ‘लाइगर’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. त्याचबरोबर स्टार्सही त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी, अभिनेता त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट ‘Liger’ च्या प्रमोशनसाठी बिहारमधील पाटणा येथे पोहोचला आहे.

  विजय देवरकोंडा पाटणाच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो. इतकंच नाही तर पटणाच्या  प्रसिद्ध ग्रॅज्युएट चायवाली स्टॉलवरही तो पोहोचला. जिथे त्याने कडक चहा प्यायला आणि तिथे उपस्थित लोकांसोबत सेल्फी आणि फोटोही काढले.

  या भेटीचा फोटोही विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘मेगास्टार चिरंजीवी कोनिडेला सर आणि सलमान खान सर तुमचे आशीर्वाद आणि लीगरवरील प्रेम म्हणजे आमच्यासाठी जग! माझा आदर आणि प्रेम नेहमीच!’ तर आज सकाळी ‘आफत’ हे नवीन गाणं रिलीज झालं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priyanka Gupta (@graduate_chaiwali)

  या गाण्यात अभिनेता आणि अनन्या पांडेची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं चाहत्यांना खूप आवडते. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, लिगर 25 ऑगस्ट 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये थिएटरमध्ये बघायला मिळेल.