‘लाइगर’ चित्रपट OTT वर रिलीज, निर्मात्यांनी पोस्ट रिलीज करून केली घोषणा

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर लाइगर चित्रपट 23 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला. मेकर्सनी हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित केला, परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. या चित्रपटाने जवळपास 66 कोटींची कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

    निर्मात्यांनी आता घोषणा केली आहे की, आज म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी ‘Liger’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. डिस्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘लायगर’चे पोस्टर शेअर करून ही माहिती देण्यात आली आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये OTT वर प्रदर्शित होणार आहे.

    ‘लाइगर’ हा चित्रपट 90 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्म कौर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा व्यतिरिक्त या चित्रपटात रोनित रॉय, रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि विश रेड्डी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लाइगर ‘ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद या ठिकाणी झाले आहे.

    ‘लाइगर’ नंतर आता विजय देवरकोंडा लवकरच ‘खुशी’ या चित्रपटात सामंथासोबत दिसणार आहे. त्याचबरोबर अनन्या ‘खो गये हम कहा’ या चित्रपटात दिसणार आहे. विजय आणि अनन्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.