vicky and sonali in bigg boss marathi

बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi 3) एका मुद्द्यावरून विकास आणि सोनालीमध्ये (Vikas And Sonali Dispute In Bigg Boss House) मतभेद होताना दिसणार आहेत.

    बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडणं, मारामारी हे आपण बघतच असतो. (Bigg Boss Marathi 3 Latest Update)आता असंच काहीसं विकास आणि सोनालीमध्ये(Vikas And Sonali Dispute In Bigg Boss House) झालं आहे. एका मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे कळेलच.

    विकासचं म्हणणं आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी आपण बोललो होतो. बाकी काही असलं तरी एकमेकांना लॅायल तरी आहेत. लॅायल्टी आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली त्यावर म्हणाली, लॅायल्टीच्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही. कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळं अविश्वास दाखवणं, लॅायल्टी न दाखवणं हा विषय येतच नाही.

    संभाषण सुरू असताना सोनालीनं विकासला खडसावून सांगितलं, तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन कॅान्ट्रॅडीक्टरी स्टेटमेंट केलीस ना आता… सोनालीचं म्हणणं आहे ते महत्वाचं नाही. आता मी बोलते ते महत्वाचं आहे. कुठे ना कुठे तू अविश्वास दाखवतो आहेस… आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली.