कंगना राणौतच्या ‘क्वीन 2’ बद्दल मोठं अपडेट, चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार!

दिग्दर्शक विकास बहलने गेल्या वर्षी खुलासा केला होता की तो क्वीनच्या सिक्वेलवर काम करत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.

  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटांमुळे तसेच तिच्या वक्तव्यांमुळे सुद्धा चर्चेत असते. काही दिवसापुर्वी आलेल्या तिच्या तेजस चित्रपटाला प्रेक्षकांनी चित्रपट नाकारल्याने तो फ्लॅाप झाला. आता कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाकडुन तिला मोठ्या अपेक्षा आहेत. कंगनानं बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, मात्र  2014 मध्ये आलेल्या ‘क्वीन’ (Queen) चित्रपटातनं तिला वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता क्वीनच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या सीक्वलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. चित्रपटाशी संबंधित आता नवं अपडेट समोर आलं आहे.  खुलासा केला होता की तो त्याच्या सिक्वेलवर काम करत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे.

  ‘क्वीन 2’ ची स्क्रिप्ट पुर्ण

  ‘क्वीन’ चित्रपटाला रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण होत आहेत. येत्या ७ मार्चला हा चित्रपट एक दशक पूर्ण करेल. याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल म्हणाला की, ‘क्वीनच्या रिलीजला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. आता मला सांगायला आनंद होत आहे की आम्ही  ‘क्वीन 2’  कथा खरोखरच पूर्ण केली आहे.

  यासोबतच दिग्दर्शक म्हणाला, ‘क्वीन सुपरहिट ठरल्यामुळे अनेकवेळा मला प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं वाटतं. सिक्वेलचा खूप फायदा होईल असा विश्वास असला तरी मला त्यात घाई करायची नव्हती. त्याच्या स्क्रिप्टशी तडजोड करायची नाही, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘जर मला सिक्वेलमधून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव जाणवला नसता तर मी चार वर्षांपूर्वी फक्त पैशासाठी तो बनवला असता.’

  कंगनाला ‘क्वीन’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  कंगना राणौतला ‘क्वीन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटात कंगनाने राणी नावाच्या एका सामान्य मुलीची भूमिका साकारली होती. कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बायोपिक आहे, ज्यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.