फिल्मफेअरमध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर विक्रांत मेसीलाही समीक्षकांची पंसती, ‘हा’ पुरस्कार केला नावावर!

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 12 th Fail सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर आपल्या सहज अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) चा पुरस्कार मिळाला.

  दरवर्षी प्रमाणे यंदाही सिनेसृष्टीतील कलाकारांच्या कलागुणाचं कौतुक करणार सोहळा पार पडला. बॅालिवूडमधील मानाचा असा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी गुजरात येथे पार पडला (69th Hyundai Filmfare Awards 2024 ) या सोहळ्यात अनेक बड्या चित्रपट आणि कलाकारांनी  मानाच्या अशा Black Lady अर्थात फिल्मफेअरच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या कलाकारांच्या मांदियाळीमध्ये या पुरस्कार सोहळ्यामध्ये मोहोर उमटवली ती म्हणजे विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित 12TH FAIL या चित्रपटानं. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाची ट्रॉफी आपल्या नावावर केली तर, आपल्या सहज अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) चा पुरस्कार मिळाला. यासह आणखी कोणत्या कलाकारानं कोणता पुरस्कार जिंकला पाहुया.

  12TH FAIL नं जिंकले तीन पुरस्कार

  फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावेळी गुजरातमधील (Gujarat) गांधी नगर (Gandhi Nagar) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सगळय बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत 12TH FAIL या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार विधु विनोद चोप्रा यांना तर विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक पसंती) पुरस्कार मिळाला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

  सर्वोत्कृष्ट चित्रपट
  12 th Fail

  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  विधु विनोद चोप्रा (12 th Fail )

  सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)
  जोराम (देवाशिष मखिजा)

  सर्वोत्कृष्ट अभिनेता
  रणबीर कपूर (अॅनिमल)

  सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)
  विक्रांत मेस्सी (12th Fail)

  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)
  राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
  शेफाली शाह (थ्री ऑफ अस)

  सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
  विकी कौशल (डंकी)

  सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
  शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
  सर्वोत्कृष्ट गीतकार
  अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते- जरा हटके जरा बचके)

  सर्वोत्कृष्ट संगीत (अल्बम)
  अॅनिमल

  सर्वोत्कृष्ट गायक
  भूपिंदर बब्बल (अर्जन वॅली- अनिमल)

  सर्वोत्कृष्ट गायिका
  शिल्पा राव (बेशरम रंग- पठान)

  सर्वोत्कृष्ट कथा
  अमित राय (ओएमजी 2)
  देवाशिष मखिजा (जोराम)

  सर्वोत्कृष्ट पटकथा
  विधु विनोद चोप्रा (12th Fail)

  सर्वोत्कृष्ट संवाद
  इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
  हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)

  सर्वोत्कृष्ट छायांकन
  अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस)

  सर्वोत्कृष्ट निर्मिती
  सुब्रता चक्रवर्ती, अमित रे (सॅम बहादूर)

  सर्वोत्कृष्ट वेषभूषा
  सचिन लोवेलेकर, दिव्या गंभीर, निधी गंभीर (सॅम बहादूर)

  सर्वोत्कृष्ट ध्वनी
  कुणाल शर्मा (एमपीएसई) (सॅम बहादूर), एसवायएनसी सिनेमा (अॅनिमल)

  सर्वोत्कृष्ट संकलन
  जसकुंवर सिंह कोहली- विधु विनोद चोप्रा (12th fail)

  सर्वोत्कृष्ट साहसदृश्यं
  शिप्रो रझातोस, क्रेग मॅक्रे, यॅनिक बेन, केचा खंपाखडी, सुनिल रोड्रीगेस (जवान)

  सर्वोत्कृष्ट VFX
  रेड चिलीज (जवान)

  सर्वोत्कृष्ट नृत्य
  गणेश आचार्य (वॉट झुमका)

  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)
  तरुण दुडेजा (धकधक)

  सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण)
  आदित्य रावल (फराझ)

  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)
  अलिझे अग्निहोत्री (फर्रे)

  जीवनगौरव पुरस्कार
  डेविड धवन