विक्रांत मेस्सीचा ’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत! 2024 मध्ये होणाऱ्या पुरस्कारासाठी एंट्री

विक्रांतने सांगितले की 12वी फेल हा चित्रपट स्वतंत्र प्रवेश म्हणून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.

  अभिनेता विक्रांत मेस्सीच्या (vikrant messy) फॅन्ससाठी आंनदाची बातमी आहे. प्रेक्षकांसह समिक्षकांकडुन सातत्याने प्रशंसा मिळवल्यानंतर आता 12 वी फेल चित्रपटाने आणखी एका मैलाचा दगड गाठला आहे. हा चित्रपट ऑस्कर 2024 साठी पाठवला जात असल्याची माहिती अभिनेता विक्रांत मॅसी याने दिली आहे.

  अभिनेता विक्रांत मॅसीने स्वत: एका कार्यक्रमा दरम्यान याबद्दल माहिती दिली. विक्रांतने सांगितले की 12वी फेल हा चित्रपट स्वतंत्र प्रवेश म्हणून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या मिशन रानीगंज या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश मिळाला आहे. मात्र, मल्याळम चित्रपट 2018 ला भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश मिळाला आहे.

  अधिकृत एंट्री आणि स्वतंत्र एंट्री म्हणजे काय?

  प्रत्येक देश ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीतील चित्रपट दोन प्रकारे पाठवतो. एक म्हणजे चित्रपटाची अधिकृत एंट्री, जी काही महासंघाने ठरवली आहे. जेव्हा एखादा चित्रपट निर्माता संघाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय थेट चित्रपट पाठवतो तेव्हा स्वतंत्र प्रवेश असतो.

  12वी फेल बॅाक्स ऑफिसवर सुसाट

  12वी फेल हा चित्रपट 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, ज्याने केवळ एका महिन्यात बजेटच्या दुप्पट म्हणजेच 55.81 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विदू विनोद चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसीसोबत मेधा शंकर, संजय बिश्नोई महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

  12वी फेल हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित आहे, जो आयपीएस मनोज कुमार यांच्या वास्तविक जीवनावर लिहिलेला आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिपायाची नोकरी करण्याचे स्वप्न मनोज कुमार यांनी काही वर्षांपूर्वी पाहिले होते. उत्तीर्ण होण्यासाठी, ते फसवणूक करण्याचा निर्णय घेतात, परंतु नंतर काहीतरी घडते, ज्यामुळे त्यांचे ध्येय बदलते.