‘साबरमती एक्स्प्रेस जळणं हा अपघात नव्हता’, ‘द साबरमती रिपोर्ट’ मधून विक्रांत मेसी करणार अनेक खुलासे; दमदार टिझर रिलीज!

. 'द साबरमती रिपोर्ट' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यात विक्रांत न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

    विक्रांत मेस्सी (vikrant messy) सध्या खूप चर्चेत आहे. 12 वी फेल चित्रपटामुळे विक्रांतच सगळीकडे कौतुक होतयं. फॅन्स, सेलेब्रिटी, समिक्षक सर्वांच्याच हा चित्रपट पंसतीस पडला. त्याच्या साध्या आणि सहज अभिनयानं अनेकांना वेड लावलं. आता त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चाहत्यासांठी विक्रांत घेऊन येतोय आणखी एक दमदार चित्रपट. ‘द साबरमती रिपोर्ट’ (vikrant messy) असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताचं या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यात विक्रांत न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा 22 वर्षांपूर्वी गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती ट्रेनवर झालेला हल्ला आणि त्यात प्राण गमावलेल्या 59 जणांवर आधारित आहे.

    ‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरमध्ये तुम्हाला 27 फेब्रुवारी 2002 रोजी विक्रांत मॅसी स्टुडिओमध्ये बसलेला दिसतो. तो लाईव्ह रिपोर्टींग करताना दिसत आहे. अँकरची भूमिका साकारणारा विक्रांत साबरमती दुर्घटनेबद्दल हिंदीत सांगतो. बातमी वाचत असताना तो अचानक थांबतो आणि सांगतो की साबरमती एक्स्प्रेसचा अपघात हा अपघात नव्हता. यानंतर रेल्वे जाळणं, लोकांचे हाल आणि चेंगराचेंगरीची दृश्ये आपल्यासमोर येतात. दरम्यान, विक्रांत मॅसीच्या चेहऱ्यावर रागही दिसू लागतो.

    बालाजी मोशन पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, विकीर फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये विक्रांत मॅसी सोबत राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा आहेत. रंजन चंदेल यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.