wagdhara awards

वाग्धाराचे (WagdharaAwards 2023) अध्यक्ष डॉ. वागीश सारस्वत यांनी सांगितलं की, वाग्धारा सन्मान सोहळा २५ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. वाग्धारा सन्मान पुरस्कार तीन विभागांमध्ये देण्यात येणार आहे.

    मुंबई: वाग्धारा सम्मान २०२३ साठी (Wagdhara Awards) निर्णायक समिती आणि प्रस्तावक समिती तयार आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सगळ्यांच्या संमतीने समितीच्या सदस्यांचं आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ कला निर्देशक जयंत देशमुख (Jayant Deshmukh) यांची निर्णायक समिती तसेच वरिष्ठ पत्रकार विमल मिश्र (Vimal Mishra) यांची प्रस्तावक समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

    निर्णायक समितीमध्ये जयंत देशमुख यांच्यासोबत प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉक्टर चेतना पाठक आणि वरिष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांचाही समावेश आहे. प्रस्तावक समितीमध्ये पत्रकार विमल मिश्र, ज्येष्ठ पत्रकार अनिल तिवारी, लेखक सुभाष काबरा, संजीव निगम, अरविंद राही, शेखर अस्तित्व, सुरेश तिवारी यश, रंगकर्मी देव फौजदार, प्रियंका शक्ति ठाकुर (नागपुर), शिक्षाविद संध्या पांडे, कथक नृत्यांगना दुर्गेश्वरी सिंह (नोएडा) आणि लाफिंग कलर्सचे संस्थापक राजेश शर्मा यांचा समावेश आहे.

    वाग्धाराचे अध्यक्ष डॉ. वागीश सारस्वत यांनी सांगितलं की, वाग्धारा सन्मान सोहळा २५ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. वाग्धारा सन्मान पुरस्कार तीन विभागांमध्ये देण्यात येणार आहे. विशेष कार्यक्षेत्रामध्ये आयुष्यभर काम करणाऱ्यांसाठी वाग्धारा जीवन गौरव सन्मान, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामधल्या नऊ जणांना वाग्धारा नवरत्न सन्मान तसेच तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंग अचिव्हर्स पुरस्कार दिला जातो.