‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! विनोद तावडेंनी व्यक्त केला शोक

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाने वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्याच कर्जत येथील एन. डी. स्टु़डिओमध्ये आत्महत्या केली

    आज सकाळच्या सुमारास कला विश्वातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्य कर्जत येथील स्टुडिओमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सिनेसृष्टीतीस अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तर राजकीय वर्तुळातुनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.  ‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा!’ असं म्हणत विनोद तावडे यांनी   शोक व्यक्त केला आहे.

    मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाने वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्याच कर्जत येथील एन. डी. स्टु़डिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या अशा अचानत जाण्याने सिनेसृष्टीला मोठा हादरा बसला आहे.  राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. ‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! असं म्हणत विनोद तावडेंनी शोक व्यक्त केला  आहे.

    भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!!! असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

    कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी “एक्झिट” संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी नितिन देसाई यांना श्रद्धांजली दिली आहे.