वामिकाचे फोटो व्हायरल झाल्याने चिडले विरुष्का, आमच्या मुलीचे फोटो क्लिक करु नका, कॅमेरा आमच्याकडे होता, याची माहिती नसल्याचा दावा

अशा परिस्थितीत जेव्हा अनुष्का बेबी वामिकाला घेऊन, स्टँडमध्ये पाहायला मिळाली, तेव्हा सर्वच कॅमेरे तिच्याकडे वळले. यावेळी अनुष्काचे हावभाव पाहता, त्यावेळी तिने वामिकाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. विराटने हाफ सेंच्युरी केल्यानंतर, अनुष्का आणि वामिका हे नाचातानाही पाहायला मिळाले.

  मुंबई : टीम इंडिया आणि द. अफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका (Vamika) ही स्क्रीनवर पाहायला मिळाली. वामिकासाठी तिचे पालक फारच प्रोटेक्टिव्ह असून, आत्तापर्यंत तिचा चेहरा त्यांनी कॅमेरापासून लपवला होता.

  अशा परिस्थितीत जेव्हा अनुष्का बेबी वामिकाला घेऊन, स्टँडमध्ये पाहायला मिळाली, तेव्हा सर्वच कॅमेरे तिच्याकडे वळले. यावेळी अनुष्काचे हावभाव पाहता, त्यावेळी तिने वामिकाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. विराटने हाफ सेंच्युरी केल्यानंतर, अनुष्का आणि वामिका हे नाचातानाही पाहायला मिळाले.

  मॅचनंतर वामिकाचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट अचंब्यात टाकायला लावणारी आहे. वामिकाचे फोटो सर्क्युलेट करु नका, असे आवाहन त्यांनी मीडियाला केले आहे. त्यावेळी सगळे कॅमेरे वामिकाचा चेहरा टिपत होते, याची माहिती नसल्याचे दोघांनीही सांगितले आहे.

  का फोटो शेअर करु इच्छित नाही कोहली

  जोपर्यंत त्यांची मुलगी समजदार होत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडिया आणि कॅमेरापासून दूर ठेवण्याचा निर्णय विराट कोहलीने केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कधीही वामिकाचा फोटो शेअर केलेला नाही. तसेच त्यांनी अनेकदा वामिकाचे फोटो घेऊ नका, अशी विनंतीही अनेकांना केली आहे. दुसरीकडे वामिकाचा पहिला लूक पाहून फॅन्स आनंदी झालेले पाहायला मिळालेत.

  मुलीच्या जन्मदिनीही फोटो शेअर केले नव्हते

  वामिकाच्या जन्मदिनीही विराटने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती, मात्र त्यात वामिकाचा फोटो नव्हता.