
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. हा सामना भारताच्या हातून निसटल्याने भावुक झालेल्या विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्माने मिठी मारली.
भारत ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना (India Australia World Cup Final 2023)अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी पार पडला. भारताला मोठी हार पत्करावी लागली. भारताच्या हातून विश्वकप निसटल्याने संपुर्ण देशाला दुख: झालं आहे. यामुळे भारतीय खेळाडूही निराश झाल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या पराभवानंतरच्या क्षणांची फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे भावूक करणारे आहेत. सध्या असाचं एकं फोटो समोर येत आहे ज्यामध्ये पराभवाने भावुक झालेल्या विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून सांत्वन करताना दिसत आहे.
विराट झाला भावुक
भारताने विश्वकप गमावल्यानंतर सगळेच निराश झाले. सामना संपताच अभिनेत्री अनुष्का शर्मा खूपच उदास दिसत होती. पती विराट कोहली स्टेडियमवरून परतल्यानंतरही अनुष्का बराच वेळ आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसली. तो जवळ येताच तिने त्याला मिठी मारली आणि त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
याचबरोबर क्रिकेटर केएल राहुलचे सासरे आणि अभिनेता सुनील शेट्टीने ट्विटरवर ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले आणि टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. त्यांनी टीम इंडियाचे वर्णन वर्ल्ड क्लास टीम असे केले. तसंच दिया मिर्झानेही गेल्या काही आठवड्यात दिलेल्या संस्मरणीय क्षणांसाठी टीम इंडियाचे आभार मानले आहेत. तसेच टीम ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल अभिनंदन केले.