विराट लेक वामिकासोबत लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये स्पॅाट; वामिकाला पाहून नेटकरी म्हणाले…

26 फेब्रुवारी 2024 रोजी विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराटची मुलगी वामिका कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे

  विराट अनुष्काची लेक वामिका ही कधी कॅमेरासमोर आली असुनही सोशल मीडियासमोर फार चर्चेत असते. इतर सेलेब्रिटी किड्स प्रमाणे वामिकालाही बघण्यात चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता वामिकाला लहान भाऊ अकाय मिळाला आहे. वामिका वडिल विराटसोबत सध्या लंडनमध्ये आहे.  लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघांचाही लंच करतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Virat Kohli’s Photo With Daughter Vamika ) होत आहे.  हा फोटो पाहून चाहते वामिकावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  वामिका विराटचे लंडनमधे स्पॅाट

  26 फेब्रुवारी 2024 रोजी विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराटची मुलगी वामिका कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. वडील आणि मुलगी दोघे एका कॅफेमध्ये एकत्र जेवणासाठी गेले होते. वामिका तिच्या जेवणात व्यस्त असताना विराट फोनवर व्यस्त होता. वामिकाने नेव्ही ब्लू आणि व्हाइट चेक स्वेटर घातलेला आणि तिचे लांब केस पोनीटेलमध्ये बांधलेले दिसले.या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला असून चिमुकली वामिका किती मोठी झाली, असे प्रेमाने विचारले आहे.

  अनुष्का विराटला पुत्ररत्न

  अनुष्कानं 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म (Anushka Sharma Baby Boy) दिला. तिनं एक पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या बाळच्या जन्मासह अनुष्का शर्मा विराट कोहली पुन्हा पालक झाले आहे. त्यांनी त्याच्यां मुलाचे नाव अकाय ठेवलं  आहे. अनुष्कानं लिहिले की, वामिकाच्या धाकट्या भावाचं जगात स्वागत आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांसहीत सेलेब्रिटीही कंमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

  यावेळी अनुष्कानं पोस्टमध्ये लिहिलं होतं की, आम्हाला तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही लहान मुलगा अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचं जगात स्वागत केलंय.’

  अनुष्का पुढे म्हणाली, ‘तुमच्या आशीर्वादाची वाट पाहत आहे. आम्ही विनंती करतो की तुम्ही यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता, विराट आणि अनुष्का.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)